बोगस खतांचा मोठा साठा जप्त १५.२२ लाखांच्या मालासह चौघांवर गुन्हा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : यवतमाळच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जाणारा १५ लाख २२ हजार ८०० रुपयांचा बोगस खत साठा कृषी विभागाच्या विभागीय भरारी पथकाने जप्त केला. शहराजवळील गांधेली शिवार परिसरात १५ जून रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १,०४० बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून, शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी सहसंचालक कार्यालयाच्या विभागीय भरारी पथकातील आशिष कालुशे यांना गुप्त बातमीदारामार्फत धुळे-सोलापूर बायपास मार्गावरून बोगस खत वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली
अनुदानित खतांचा गैरवापर
जप्त केलेल्या खतांच्या प्राथमिक तपासणीत शासनाच्या अनुदानित खतांचा वापर करून त्यात अनधिकृतरीत्या इतर घटकांचे मिश्रण करण्यात आल्याचे आढळले. नामांकित ब्रँडच्या नावाखाली हा माल बाजारात चढ्या दराने विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कंपनीचे हात वर
जप्त खतांच्या गोण्यांवर मोहिनी अॅग्रोटेक, सोलापूर असे नाव छापलेले होते. याबाबत कृषी विभागाने संबंधित कंपनीशी संपर्क साधून लेखी खुलासा मागविला. त्यावर (एमएच-२८ बीबी-९८९९) या ट्रकमधील जप्त माल आमच्या कंपनीत तयार झालेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केल्याने आरोपींकडून कंपनीच्या नावाचाही गैरवापर झाल्याचे समोर आले. याप्रकरणी आशिष काळुसे यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होती. त्यानुसार पथकाने गांधेली शिवारात सापळा रचून (एमएच-बीबी-९८९९) ट्रक २८ अडविला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये खतांच्या १,०४० बॅगा आढळून आल्या. चालक राजेंद्र नागरे याच्याकडे चौकशी केली असता हा माल यवतमाळ
जिल्ह्यातील उमरखेड व फुलसावंगी परिसरांत विक्रीसाठी नेण्यात येत होता. पुढील चौकशीत हा माल हडपसर (पुणे) येथील आर. आर. अॅग्रो फर्टिलायडार व कृषी गौरव फर्टिलायझर येथून घेतल्याची माहिती चालकाने दिली.