अमृत युवा शासन संवाद उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना दिली शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयात ङ्ग अमृत युवा शासन संवादफ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथमच या उपक्रमाची सुरुवात सिल्लोड तहसील कार्यालयातून करण्यात आली.

अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभाग प्रमुख अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अंकिता ताकभाते होत्या.

 त्यांनी अमृतच्या या उपक्रमाचे कौतुक करत, शासन आणि युवक यांच्यात थेट संवाद निर्माण करणारा हा अतिशय उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले. यावेळी तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजना, त्यांचे लाभ, तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.

विविध प्रमाणपत्रे व शासकीय कागदपत्रे कशी तयार केली जातात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सिल्लोड तहसील कार्यालयातून या उपक्रमाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिला शुभारंभ होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. तहसीलदार अंकिता ताकभाते, तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अधिक यशस्वी झाला.

योगेश रोडे, अमृत जिल्हा उपव्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
अनेक विद्यार्थ्यांनी ही त्यांची तहसील कार्यालयातील पहिलीच भेट असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेले मार्गदर्शन समजण्यास सोपे व उपयुक्त असल्याचे सांगत, भविष्यात स्वतः ची कागदपत्रे तयार करताना आणि गावातील नागरिकांना मार्गदर्शन करताना या माहितीचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

या कार्यक्रमाला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, राज कॉम्प्युटरच्या संचालिका जयश्री कुलकर्णी, सहायक महसूल अधिकारी अशोक दराडे, पुरवठा विभागाचे बळीराम मुंडे, संजय गांधी योजना विभागाचे अशोक मोरे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.