सूर्योदय परिवाराच्यावतीने कार्डियाक ॲम्बुलन्स चे लोकार्पण ; भैयुजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी उदयसिंह (भय्यूजी महाराज) देशमुख यांची उपस्तिती

Foto
शहरातील आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) हॉल समर्थ नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  राज्याचे माजी आरोग्यमंत्री  डॉ. दीपक सावंत,  भैयुजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी उदयसिंह (भय्यूजी महाराज) देशमुख शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे , कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी डॉ. ओमप्रकाश शेटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, इंडियन मेडिकल असोसिएशन कुलदीपसिंह राऊळ, मनपा सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे उपाधीस्थता डॉ. शिवाजी सुक्रे, बाळासाहेब थोरात आदींची 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंबादास दानवे म्हणाले की, या कार्डियाक ॲम्बुलन्स मध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध असून एक आवश्यकता म्हणून ही अबूलान्स रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.  औरंगाबादचे अनेक डॉक्टर हे चांगल्या आरोग्य सेवा पुरवित असल्याचेही यावेळी दानवे यांनी सांगितले. तर  मुख्यमंत्री साह्यता निधीचे कक्षप्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले कि, मराठवाड्याला सर्वात जास्तच दिले आहे. ट्रान्सप्लांट मध्ये देशात महाराष्ट्राचे  स्थान पाहिल्यास्थानी आहे. ५०० कोटी सीएम रिलीफ फंड पाठविण्यात आले आहे. 

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी देशमुख म्हणाल्या कि,  राष्ट्रसंत भैयू महाराज हे नेहमी सांगायचे की औरंगाबाद ही माझी कर्मभूमी आहे. यावेळी त्या म्हणाल्या की  भैयूजी महाराज दूर गेले नासून ते जवळ, आसपासच आहेत असे सांगत आज बोलताना आयुषी देशमुख या भावुक झाल्या. आरोग्य संदर्भात एक कौतुकास्पद बाब असून  आणखी एक अंबुलन्स लवकर देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आपले मनोगतात म्हणाले कि ऍम्ब्युलन्स मध्ये जाणारा प्रत्येक रूग्ण बरा व्हावा. किती लवकर उपचार होतो तरी यासाठी कार्डियाक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.मोटरबाईक ऍम्ब्युलन्स इतर  एम्बुलन्सच्या तुलनेत प्रभावी ठरते. वैद्यकिय  चांगलं काम उभं करू शकत. आत्महत्या पासून शेतकऱ्यांचे परिवर्तन  करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

तर शिवसेना नेते  खा. चंद्रकांत खैरे यांनी सांगितले कि, अवयव प्रत्यारोपणात पूर्वी  सक्सेस रेशो कमी होता परंतु आता हा रेशो वाढला आहे. प्रधानमंत्री रिलीफ फंड हे जास्तीत जास्त 3 लाख तर कमीत कमी ५० हजार रुपये मिळतो. प्लेगच्या काळात खूप फिरलो प्रसंगी पिटलं भाकर खाल्ली. खुप कर्तव्यांन काम करावं लागतं. हार्ट पेशंट वाढले आहे. त्यासाठी अश्या एम्बलन्स ची आवश्यकता आहे. २३ फेब्रुवारीला आरोग्य मेळावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker