इंद्रराज महाविद्यालयात व्याख्यान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) येथील इंद्रराज महाविद्यालयत महिला सबलीकरण समिती मार्फत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. राजपूत होते. व्याख्यानात प्रा. डॉ. ए. टी. मोरे यांनी जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. व्ही. बी. लांब सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्रस्ताविक डॉ. मनीषा मुगळीकर, सूत्रसंचालन डॉ. सुचिता देशमुख, आभार डॉ. सविता मस्के यांनी मांडले.