सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सिल्लोड येथे तालुका विधि सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एस. एस. देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश ए. एच. तट्टू, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पंडित सहाय्यक विस्तार अधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव दौड हे होते.
याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश ए. एच. तट्टू यांनी पोक्सो तसेच हुंडाबळी यांच्या संबंधित कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, उदार यांनी वाहतुकीचे नियम, अॅड शेख उस्मान यांनी जागतिक कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर मानवाधिकार, अॅड एस. आर. काकडे यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क २०१६ कायदा २०१६ यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दिवाणी न्यायाधीश श्री एस. एस. देशमुख यांनी विविध कायद्याबद्दल विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
प्रास्ताविक अॅड अशोक तायडे यांनी तर सूत्रसंचालन अॅड आर. एस. गोराडे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सपाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे सचिव अॅड हमीद खान, अॅड मोठे, अॅड खंडळकर, अॅड पठाण, अॅड बडक, अॅड मगर, अॅड आरके, अॅड ताठे, हिरेकर, विठोरे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक म्हस्के, मगर, कोलोड, परदेशी, राजपूत, सोनवणे, तायडे, काळे मॅडम, वडमारे, सनांसे, चव्हाण, ताटू, दौड, काळे, सोनवणे, सागरे, सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.















