पैठण (प्रतिनिधी) पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुने पंप हाऊस ते ऐतिहासिक (चमान), नगरपरिषदेच्या जागेवरील व यात्रेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील लिंबाचे मोठमोठे झाड विना परवानगी तोडून सपाटी करण करण्यात येत आहे. याकडे नगरपरिषद, वन विभाग, तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
नगर परिषदेच्या हद्दीतील सर्वे नंबर २३०,२३२,२३३,२३४,२३५,२३७ हे यात्रेसाठी आरक्षित आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास नियमानुसार मनाई आहे. त्यातच सर्वे नंबर २३० व २३२ मध्ये पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पंप हाऊस साठी जागा आरक्षित आहे सदरची जागा ही नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आलेली आहे. त्यावर ताबा नगरपरिषदचा आहे असे असताना
याठिकाणी असलेले मोठ मोठी लिंबाची झाडे विना परवानगी तोडण्यात येत आहे . याकडे नगरपरिषद, वन विभागाचे अधिकारी, तहसील कार्यालय यांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर कोट्यावधी रुपये खर्च करून मोक्षघाट बांधण्यात आलेले आहे.
या ठिकाणी दररोज शेकडा च्या संख्येने दशक्रिया विधी पार पडते. दशक्रिया विधी संपन्न होत असताना पिंडदान काकस्पर्श साठी आप्तजन हे पिंड जुन्या पंपापासून वर ठेवतात. काक
(कावळे) हे या पंपाऊसमोर असलेल्या लिंबाच्या झाडावर बसलेले असतात व ते पिंडाला स्पर्श करतात. परंतु या ठिकाणी असलेली लिंबाची झाडे बेकायदेशीर ल्या तोडण्यात येत असल्याने नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.















