सिल्लोड, (प्रतिनिधी) : गेवराई सेमी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे आता समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने केलेली शिकार एका झाडावर मृत अवस्थेत आढळून आली. तसेच बिबट्याच्या पायाचे उसे देखील दिसून आले. ही माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
गेवराई सेमी, उमरावती, पळशी, अंधारी, केहऱ्हाळा गावांना डोंगर लागून आहे. या डोंगरभागात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तर शेतकरीही डोंगरभागात जनावरे नेतात. शिवाय डोंगरालगत अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. एवढेच नव्हे तर काही शेतकरी डोंगराशेजष्ट्री वास्तव्यास बिबट्याने शिकार अशी झाडावर नेऊन फस्त केली.
आहे. गेवराई सेमी शिवारात रविवारी (दि. ९) बिबट्याने केलेली शिकार एका झाडावर मिळून आली. यामुळे शेतकरी प्रचंड घाबरले. ही माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला देताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. यापूर्वी पळशी शिवारातील डोंगरालगत असलेल्या खोरा परिसरात बिबट्या दिसून आला होता. सध्या रब्बी हंगामाच्या पेरणीची लगभग सुरू आहे.
तर पाणी भरण्यासाठी महावितरण कंपनीकडून चार दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असा वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या शिफ्टमध्ये पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र बिबट्याचा वावर असल्याचे समोर जागून काढावी लागते. त्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गेवराई सेमी, पळशी, केह-हाळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.















