सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळशी आणि उपळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सलग होत असलेल्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी पळशीत आठ शेळ्या फस्त केल्यानंतर, आता उपळी शिवारातही बिबट्याने चार शेळ्यांचा बळी घेतला आहे.
उपळी येथील शेतकरी कैलास महिपत मिरगे यांच्या शेतात गुरुवारी (ता. १२) रात्री बिबट्याने हल्ला करत चार शेळ्या ठार केल्या. यामध्ये मिरगे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान
झाले आहे. यापूर्वी भगवान जोनवाळ या शेतकऱ्याच्या १३ शेळ्या बिबट्याने एकाच वेळी मारल्या होत्या, ज्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. वन विभागाचे कर्मचारी साईनाथ पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोचून पंचनामा केला आहे. दरम्यान, उपळी शिवारातील शेतकरी अजिनाथ मिरगे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसला.
--- वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी ---
पळशी - उपळी परिसरातील सलग घडणाऱ्या या घटर्नामुळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना दिवसाही शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करून परिसरात पिंजरा ग्रामस्थांनी केली आहे. लावावा, अशी आग्रही मागणी या घटनेची टनेची माहिती वरिष्ठ देण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा केला असून, नागरिकांनी सतर्क राहावे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे आणि जनावरांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. साईनाथ पवार, वनरक्षक यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून पळ काइला, मात्र या घटनेमुळे परिसरात भोती अधिकच वाढली आहे.















