तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ
खुलताबाद (प्रतिनिधी) : तालुक्यातील मावसाळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने कुत्र्याचा फाडशा पाडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील मावसाळा परिसरात डोंगराळ भाग क्षेत्र असल्याने बिबट्याचा वावर वाढला असून पाणी डोंगर असल्याने तो क्षेत्र सोडत नाही. आता हे तिसऱ्यांदा बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला करून फाडशा
पाडला आहे. शेत गट क्रमांक ३३ मधे निळकंठ गवळी यांच्या पाळीव कुत्र्याचा फाडशा पाडला आहे.
मावसाळाचा भाग, कागजीपूरा दौलताबाद रसुलपूरा जटवाडा सर्व डोंगर रांगा व डोंगराळ भाग क्षेत्र असल्याने तलाव केटी बांध नाल्यात पाणीसाठा उपलब्ध असल्याने बिबट्या व इतर जंगली जनावर येथे च आसपास वावर करुन असतता तर बिबट्या संदर्भात सतत वावरच्या ओरड होत असताना वन विभाग याकडे दुर्लक्ष करुन आहे. दौलताबाद घाटात रात्री बिबट्या सरळ रोडवर आल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती.
डोंगराळ भागामुळे बिबट्याचा वावर परिसरात आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करुन नागरिकांची भीती घालवावी. सद्या शेतकरी नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. येथे विट भट्टी धारकांचा वापर वाढला आहे. वनविभागाने गंभीरतेने घ्यावे, असी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.














