मोबाईल टॉवरच्या इमारतींना व्यावसायिक कर लावा स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांची मागणी ५० ते ६० मोबाईल टॉवरच अधिकृत

Foto
मोबाईल टॉवरच्या इमारतींना व्यावसायिक कर लावा
स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांची मागणी
५० ते ६० मोबाईल टॉवरच अधिकृत
▶ शहरात ७०० हून अधिक मोबाईल टॉवर असून, त्यापैकी ६२२ टॉवर अनधिकृत आहेत. ५० ते ६० टॉवर अधिकृत आहेत. टॉवर असलेल्या बहुतांश मालमतांवर सध्या निवासी दरानेच मालमत्ता कर आकारला जात असल्याची माहिती उपायुक्त विकास नवाळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडू शकते, असा दावा सदस्यांनी केला असून यामुळे महापालिकेच्या तिजोरीला मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपाच्या उत्पन्नवाढी उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक मजहर पठाण यांनी शहरातील मोबाईल टॉवर आणि त्यावरील कर आकारणीचा मुद्दा उपस्थित केला. मोबाईल टॉवर असलेल्या मालमत्तांवर नेमक्या कोणत्या प्रकारे कर आकारला जातो, अशी विचारणा त्यांनी केली. यावर सभापती मकरिये यांनी सन २०२२ पासून केंद्र
शासनाच्या आदेशानुसार मोबाईल टॉवरवर स्वतंत्र कर आकारणी करता येत नसल्याचे स्पष्ट केले. उपायुक्त विकास नवाळे यांनी निवासी वापराच्या मालमत्तांवर निवासी, तर व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर व्यावसायिक दराने कर आकारला जात असल्याची माहिती दिली. यावेळी भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी मालमत्ताधारकांना भाडे मिळत असल्याने त्या मालमतांचा वापर व्यावसायिक स्वरूपाचा ठरतो. त्यामुळे अशा सर्व मालमत्तांना व्यावसायिक दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील ज्या इमारतींवर किंवा मालमत्तांवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत, त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याने अशा इमारतींना निवासीऐवजी व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. मनपाच्या स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. हा निर्णय लागू केल्यास
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee सोल्युशन्स·