गोवंश तस्करी व अवैध कत्तल करणाऱ्या ११ वाहनांसह चालकांचे परवाने रद्द गोवंश तस्करांचे धाबे दणाणले; अनेक तस्कर झाले भूमिगत

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) चोरट्या मार्गाने गोवंश जनावरांची अवैध कत्तल, गोमांसाची विक्री आणि जनावरांना क्रूरतेने डांबून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ११ वाहने आणि त्यांच्या चालकांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत.
प्रकाश जाधव यांच्या निर्दे शानुसार बेकायदेशीर गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी १९ वाहन व चालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ वाहनांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून
६ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने ९० दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित बाहेरील जिल्ह्यातील वाहन व चालकांबाबत संबंधित आरटीओ कार्यालयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात गोवंश तस्करांविरोधात धडक मोहीम उघडल्याने अनेक तस्कर भूमिगत झाल्याचे सांगण्यात आले.
दि. १६ ते २६ मे या दहा
POLICE
दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी छुप्या मार्गावर कडक नाकाबंदी, गस्त आणि नियोजनबद्ध छापेमारी केली. यामध्ये वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड ग्रामीण, चिकलठाणा, देवगाव रंगारी, सिल्लोड ग्रामीण, फुलंब्री, वडोद बाजार, करमाड, फर्दापूर, खुलताबाद, विरगाव, पाचोड, शिवूर आणि एमआयडीसी पैठण आदी पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी सहभाग घेतला.
१११ जनावरांची सुटका
कत्तलीच्या उद्देशाने छुप्या ठिकाणी डांबून ठेवलेली ४२ गोवंश जनावरे सुखरूप सोडवली. तसेच वाहनांमध्ये क्रूरतेने कोंबून वाहतूक केली जाणारी ६९ जनावरे जप्त करण्यात आली. सुमारे ३३ लाख ९९ हजार रुपये मूल्य असलेल्या १११ जनावरांची मुक्तता करून त्यांना अधिकृत गोशाळांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या दहा दिवसांच्या मोहिमेत पोलिसांनी ४४ आरोपींकडून २४ गुन्ह्यांमध्ये १ हजार ९४५ किलो गोमांस, १११ गोवंश जनावरे आणि इतर साहित्य असा एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions