बिडकीन शहरात लाईनमन दिवस उत्साहात केला साजरा

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) वेळ कोणतीही असो तुमच्या जीवनात नाही होणार अंधार, आपल्याला आहे लाईनमनचा आधार हे वाक्य तंतोतंत खरं करण्यासाठी रात्री अपरात्री, ऊन, वारा, पावसासह अनेक नैसर्गिक व कृत्रिम आपत्तींमध्ये जीवाची पर्वा न करता सेवा देणारा जनमित्र म्हणजे लाईनमन, देशभरातील विद्युतपुरवठा क्षेत्रातील खऱ्या अर्थाने कष्टकरी कर्मचाऱ्यांचा आजच्या दिवशी सन्मान करण्यात येतो. नुकतेच बिडकीन शहरातदेखील चौथा लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा करून विद्युत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

लाईनमन दिनानिमित्त बिडकीन उपविभाग कार्यालयाकडून जनजागृती फेरी काढून
जास्तीत जास्त स्मार्ट मीटर बसवून विजेची व पैशांची बचत कशी करावी, कोणत्या कालावधीमध्ये किती वीज वापरावे, किती वीज दर लागेल, विजेच्या अपघातपासून स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची तसेच पाळीव प्राण्यांची कशी काळजी घेतली पाहिजे आदी बाबींविषयी जागृती करण्यात आली.
जनजागृती फेरी दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे, उपसरपंच किरण गुजर, मधुकर सोकटकर, अॅड. सतीश हाडे आदींसह सामाजिक कार्यकर्त्यानी उपस्थित कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. 

यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रकाश वाहुळे, सहाय्यक अभियंता विनय नांद्रे, अनील सौवर, बाळासाहेब बर्वे, विवेक जाधव, अमोल खंडागळे, राम बोबडे, सहाय्यक लेखापाल अंबादास पवार, मानव संसाधन विभागाचे उपव्यस्थापक शेख मुस्ताक, जितेंद्र हाडे, सोपान निळ, मुख्य तंत्रज्ञ अर्जुन गव्हाणे, रमेश जाधव, रमेश देवरे, विजय वीर, ऋषिकेश सोनवणे, योगेश जाधव, शंकर करताडे, संदीप चाटे, सचिन थोटे, आतिश नाडे, अनिरुद्ध गोर्डे, नामदेव शेळके, राधेश्याम सोलाटे, शेख आमजत, मनोज पाबळे, अमोल शेकटकर, भगवान बोंबले, कांचन क्षीरसागर, दिगंबर काळे, महेश बागडे, भूषण ठोंबरे, दीपक मुके आदींसह विद्युत कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.