ठाकरे सेनेच्या ६ फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत यांचा न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल

Foto
मुंबई  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्लीतून एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या ६ बंडखोर खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणावर आता शिक्कामोर्तब झाले असून, यामुळे उद्धव ठाकरेंचे हे ६ खासदार आता कायदेशीररित्या शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र शब्दांत न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तोफ डागताना संजय राऊत म्हणाले की, ङ्गङ्घसर्वोच्च न्यायालयही गुलाम आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४० आमदारांच्या आमच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल दिला असता, तर वारंवार देशात पक्ष फोडले गेले नसते. देशात लोकशाहीवर बलात्कार करून हत्या होत आहे. संविधान कुठे उरले आहे? दहाव्या परिशिष्टात कुठल्याही पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला मान्यता नाही. मग लोकसभा अध्यक्षांनी ६ फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली?ङ्घङ्घ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते ५० कोटींना विकले गेले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना राऊत म्हणाले, ङ्गङ्घएकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तर ते आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील ते सत्य आहे आणि नीतिमत्तेचे आहे असे नाही. ते मशालीवर निवडून आलेले ६ लोक तुम्ही ५० कोटींना विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. ते चांगले की वाईट हे सोडून द्या, हे गद्दार आहेत. यात कोणते शौर्य, नीतिमत्ता आणि लोकशाही आहे? चांगले आणि वाईट याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही त्यांना मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मते पडली आहेत, मशालीला मते पडली आहेत, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही.

दाढीवर हात फिरवून नीतिमत्ता शिकवू नका
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्ही काय आम्हाला सांगत आहात? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल, हे लक्षात घ्या. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी नीतिमत्ता आहे, ती अमित शाह यांच्या पायापाशी गहाण पडली आहे. मुळात तुम्हाला आब्रू नव्हती. हे जे ६ लोक आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, ते निर्लज्ज आहेत. गद्दार शब्दसुद्धा त्यांना कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष किंवा पार्लमेंट जे आहेत, हा लोकशाहीवरचा बलात्कार करून हत्या केल्यासारखा प्रकार आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत ते सिरीयल रेपिस्ट आहेत. लाज वाटत नाही का या लोकांना पक्ष फोडायला? ५०-५० कोटींना माणसे विकत घेता? लोकांना खायला अन्न नाही, पाणी नाही, लोक शिक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत आणि तुम्ही आम्हाला काय दाखवत आहात? तुम्ही सिरीयल रेपिस्ट आणि सिरीयल किलर आहात, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.