लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; राज्यात चार टप्पयात मतदान; २३ मे ला मतमोजणी

Foto
 
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा आज नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त  सुनील अरोरा यांनी केली आहे. याबरॊबरच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान घेतले जाणार असून राज्यात चार टप्प्यात मतदान होईल. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.
 
     देशभरात एकूण ९० कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहे. देशात एकूण १० लाख मतदान केंद्रे असतील ज्यावर नागरिक मतदान करू शकतील. मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ईव्हीएम यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्र देखील असणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ७ कोटी मतदार वाढले आहेत. या घोषणेबरोबरच आचारसंहिता देखील जाहीर झाली असल्यातने सर्वांनी आदर्श  आचारसंहितेचे पालन करावे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आचार संहितेचा भंग करणाऱ्या विरोधात मोबाईल ऍप द्वारे तक्रार करता येणार असून तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्रात कधी किती जागांसाठी मतदान 
११ एप्रिल ७ जागांसाठी मतदान 
१८ एप्रिल १०  जागांसाठी मतदान   
२३ एप्रिल १४ जागांसाठी मतदान  
२९ एप्रिल १७ जागांसाठी मतदान