सिल्लोड, (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सिल्लोड काँग्रेसच्या कार्यालयात ज्येष्ठ काँग्रेस नेते भास्करराव घायवट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या विचारांनी समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा दिली असून, त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
जिल्हा सरचिटणीस शेख फिरोज अकबर अॅड. लिंगायत, मंगेश कळम, शेख रईस, अश्फाक पठाण, फिरोज मेवाती, शेख साजिद, सागर सोनवणे, गौरव सुरडकर, जयेश फुलपगारे, प्रज्वल सुरडकर, साई सुरखकर, समाधान कांबळे, गोपाल आहोरे, रितेश फुलपगारे, कुणाल नरवडे, राहुल माहाले, गौरव सोनवणे, किरण सोनवणे, करण पंडागळे, शिवा आहीरे, मंगेश कांबळे, नितीन कांबळे, सुमित पवार, रवि बोरडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.














