पैठण, (प्रतिनिधी): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकानिमित्त पैठण नगरी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक उत्साहाने उजळून निघाली. आणि जगू द्या, अहिंसा परमो धर्म की जय, अहिंसा आणि सत्याचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला.
या पवित्र दिनानिमित्त सोमवारी सकाळी पैठण नाका येथील महावीर चौकातून भव्य आणि आकर्षक शोभायात्रेला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात, मंगल ध्वनीत आणि ङ्गङ्घमहावीर स्वामी की जयफच्या जयघोषात निघालेली ही शोभायात्रा संपूर्ण शहरातून फिरत धार्मिक
एकात्मतेचा संदेश देत होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत शोभायात्रेला विशेष शोभा आणली, तर युवकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. सुरुवातीला मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या शोभा यात्रेमध्ये पैठणचे आमदार विलास भुमरे, पैठण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पाचोड जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे पाटील हे सहभागी झाले होते.
यावेळी मुनीसुवृत्तनाथ भगवान व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचा अभिषेक विधीपूर्वक पार पडला. या मंगल सोहळ्यास माजी नगरसेवक भूषण कावसानकर, मंदिरचे महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन पहाडे, सचिव विशाल काला, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष स्वदेश पांडे, शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रविंद्र काळे पाटील, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राज्याच्या भाजप प्रदेश सरचिटणीस रेखाताई कुलकर्णी, नगरसेवक गोवर्धन टाक, नगरसेवक
महेश मुंदडा, नगरसेवक बजरंग लिंबोरे, नगरसेवक शिवराज पारिख, नगरसेवक सुनील रासने, नगरसेवक कृष्णा मापारी, स्वप्निल साळवे, गौरव आठवले, वैशाली परदेशी, ज्ञानेश्वर दहिवाळ, अश्विनी लखमले, गणेश वरकड, सुनील सोनारे, कृषिभूषण सुनील बलदवा, श्याम काळे, व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी कल्याण बरकसे, किशोर चौधरी, राजू औटे पाटील, किशोर भाकरे, महावीर भूस, कैलास पाटणी, संजय गंगवाल, कैलास काला, वर्धमान पहाडे, राहुल पाटणी, कपिल पहाडे, नरेंद्र बडजाते, किशोर बडजाते, नीलम चांदीवाल, अर्चना पहाडे, रेखा कासलीवाल तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.











