पाण्याच्या अपव्ययावरून नगरसेवक आक्रमक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वारंवार तक्रारी आणि सूचना देऊनही फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती न करणाऱ्या आणि लाखो लिटर पाणी वाया घालवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर दंड का आकारला जात नाही, असा प्रश्न नगरसेवकांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.४) उपस्थित केला.
पाण्याचा अपव्यय केल्याने महापालिकेने
नुकतीच एका नागरिकावर कारवाई केली. त्याच्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या या कारवाईचे एकीकडे स्वागत होत असताना, दुसरीकडे शहरातील ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे वाहून जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीवर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. बैठकीत मुद्दा उपस्थित करताना नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर
जोरदार ताशेरे ओढले. जवाहरनगर, भानुदासनगर, विष्णुनगर यांसारख्या अनेक भागांमध्ये जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यांवरून वाहून जात आहे. या संदर्भात नगरसेवक पोटतिडकीने सभागृहात आणि संबंधित विभागाकडे तक्रारी करतात. मात्र, महिना-महिना उलटूनही अधिकारी या वाहिन्यांची दुरुस्ती करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions