अपात्रता सुनावणीत नगरसेवकांनी मागितला वेळ

Foto

महापालिका आयुक्तांसमोर ९ प्रकरणांची सुनावणी; तीन अपत्ये अन् अनधिकृत बांधकामाचा ठपका
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) तीन अपत्ये असणे, अनधिकृत बांधकाम, मालमत्तांवरील अतिक्रमणे तसेच शहागंज परिसरातील अतिक्रमणाला खतपाणी घातल्याच्या विविध आरोपांवरून दाखल ९ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या तक्रारींवर सोमवारी (दि. २४) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान तक्रारदारांचे म्हणणे व दाखल पुरावे लक्षात
घेता, संबंधित नगरसेवक व नगरसेविकांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून उत्तर मांडण्यासाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय देत नगरसेवकांना मुदतवाढ मंजूर केली असून, पुढील सुनावणीची तारीख संबंधितांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नगरसेवकांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील महाराष्ट्र महानगरपालिका
सनी संभालीनगर महानगरपालिका
अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) आणि १० (१-४) अन्वये टप्प्याटप्प्याने सुनावणी
छत्रपती संभाजीनगर
घेतली जात आहे. महापालिका निवडणुकीनंतर एमआयएमच्या १८, भाजपच्या सहा आणि
शिवसेना शिंदे गटाच्या एक अशा एकूण २५ नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७ ऑगस्टला नऊ, तर सोमवारी आणखी नऊ - प्रकरणांवर सुनावणी झाली. यावेळी प्रत्येक तक्रारीची स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात आली. काही नगरसेवकांनी कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिलांची मदत घेतली. तक्रारींसोबत सादर करण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्रे तपासण्यासाठी संबंधित
सदस्यांनी वेळ मागितला. आयुक्तांनी ही मागणी मान्य केली असून पुढील सुनावणीची तारीख संबंधितांना लेखी कळविली जाणार आहे. त्यामु‌ळे ७ सप्टेंबरला नऊ, तर १५ सप्टेंबरला ११ सदस्यांच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या नगरसेवकांच्या प्रकरणावर सुनावणी १७ ऑगस्ट रोजी अभिजीत जीवनवाल, गणेश नावंदर, नुरजहान इकबाल, फिरोज खान, खान अब्दुल मतीन,
दोनपेक्षा अधिक अपत्याच्या तक्रारी
नगरसेवक फेरोज खान, शेख नरगीस सलीम आणि मोहम्मद वसीम यांच्या विरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या तक्रारी आहेत. तर नगरसेवक मोहम्मद वाजेद आणि मेराज खान यांच्याविरोधात अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरून तक्रारी दाखल आहेत. तसेच विरोधी पक्षनेता अब्दुल समीर, नगरसेवक सय्यद सोहेल, भारती सोनवणे आणि जिवकपाल हिवराळे यांच्याविरुद्ध अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आहेत.
मोहम्मद वसीम, सय्यद सोहेल, मेराज खान आणि मुंशी भिकन शेख यांच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. यामध्ये अतिक्रमण,
अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाला प्रोत्साहन आणि दोनपेक्षा अधिक अपत्ये या कारणांचा समावेश आहे.