पैठण, (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाची विचारधारा मांडणारे व काँग्रेस पक्षावर निष्ठा काम करणाऱ्यांनाच नवीन जबाबदारी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पैठण येथे बोलताना व्यक्त केले.
पैठण येथे सोमवारी संघटन सुजन अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आशीर्वाद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस प्रदेश प्रभारी विवेक बंसल, माजी मंत्री अनिल पटेल, खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर कांचन चाटे, महानगरपालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब जगताप, ज्येष्ठ नेते दिलीप देशमुख, अशोक नरके, रमेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की काँग्रेसच्या संघटन व सुजन अभियान अंतर्गत ही बैठक केवळ बैठक नसून आगामी राजकीय दिशा ठरवणारी बैठक आहे. देशात काँग्रेसची विचारधारा मानणारे व तिच्यावर निष्ठा ठेवून काम करणारे असंख्य नेते, कार्यकर्ते असून ते निष्ठा ठेवण्यात काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत.
जय काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून काम करतील त्यांनाच पुढे जाण्याची संधी मिळणार असून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असून कार्यकर्त्याच्या जोरावर काँग्रेस पक्ष
नव्याने उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल म्हणाले की इंदिरा काँग्रेस पक्षाला बळ देण्यासाठी ग्रामीण व शहरातील कार्यकत्यांनी आपसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून एक जुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तर बंसल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकत्यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास रमेश मुळे, शहर अध्यक्ष तथा गटनेता हसनोद्दीन कट्यारे, निमेश पटेल, युवा नेले किशोर दसपुते, रावसाहेब नाडे, बाबासाहेब पवार, पाशा मंजन, अंबादास ढवळे, योगेश जोशी, अनिल मगरे, सदानंद खडसन, संभाजी काटे, महेश पवार, प्रकाश निवारे, शेखर देशमुख, कामगार नेते नवगिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.














