लुडो, पबजी नंतर आता टिकटॉकवर व्हिडियो बनवणाऱ्यांचीही स्पर्धा; मनसे चित्रपट सेनेचा अनोखा उपक्रम

Foto
औरंगाबाद: टिकटॉक या ऍपची सध्या तरुणाई मध्ये जबरदस्त क्रेज असल्याचे पाहायला मिळत आहे. या अप्लिकेशनवर १५ सेकंदाचे मनोरंजनात्मक व्हिडिओ अपलोड करून अनेक तरुण तरुणींनी त्यांचे लाखो फॉलोअर्स बनवले आहे. युवकांचा वेळ वाया घालवणाऱ्या या ऍपवर टीका होत असली तरी या ऍपच्या माध्यमातून आपले व्हिडियो बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाहीये. युकांच्या याच कलागुणांना वाव देण्यासाठी  मनसेच्या चित्रपट सेनेने अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये टिकटॉकवर व्हिडियो बनवणारे यूजर सहभागी होऊ शकतील. विशेष म्हणजे विजेत्यांना पारितोषिकही देण्यात येणार आहे. 

मराठवाड्यातील टिकटॉकवर असणाऱ्या कलाकारांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  यातंर्गत येरे येरे पावसा... या चित्रपटातील आश्विनी ये  ना... या   गाण्यावरील  १५ सेकंदाचा व्हिडियो रेकॉर्ड करून स्पर्धेशी संबंधित आयोजकांच्या व्हाटसअप क्रमांकावर पाठवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वोत्तम व्हिडियो बनवणाऱ्या युवकाला 'टिकटॉक किंग' तर युवतीला 'टिकटॉक क्वीन' घोषित करण्यात येणार आहे. 

व्हिडियोमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्त आल्यास  व्हिडियो बाद ठरवण्यात येईल अशी अटदेखील ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचा निकाल  मनसेच्या चित्रपट सेनेच्या वेबसाईटवर १३ ऑगष्ट रोजी सायंकाळी ५ वाजता लागणार आहे. यानंतर बक्षीस वितरणाचे स्थळ वेळ आणि दिनांक कळवण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker