छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मंगळसूत्र हिसकावणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी मकोकानुसार कारवाई केली. सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे याच्यासह एकूण ६ साथीदारांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या टोळीला अटक केल्यावर एकाचवेळी सुमारे ९ गुन्ह्यांची उकल झाली होती.
अमोल वैजिनाथ गलाटे, मंगेश वाल्मिक शहाणे, शेख अल्ताफ शेख मुबारक, शेख सिराजुल हक शेख अन्वर अली, अमन महेबुब शेख, आदित्य अनिल काळे अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
यातील गलाटेविरुद्ध ५६, शहानेविरुद्ध ११, अल्ताफविरुद्ध ९ गुन्हे दाखल असल्याचेही
म्हणाले. या टोळीविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. आता या गुन्ह्यात मोक्काचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, अंमलदार दिपाली सोनवणे, महादेव दाणे यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













