गंगापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २०२६ ( गट) परीक्षेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थिती लावली.
संभाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक, या केंद्रावर (व्हेन्यू कोड: ९) परीक्षेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सीट मॅपिंगची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून, परीक्षेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोणताही परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
परीक्षार्थीनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ही राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानली जात असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे. शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत वाट पाहताना दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.













