एमआयडीसीला इंधन टंचाईच्या झळा...

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून वाळूज एमआयडीसीतील उद्योगांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलअभावी वाहतूक मंदावली असून मालाची आयात-निर्यातही मंदावली आहे. परिणामी वाळूज, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसर, बिडकीन या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
औद्योगिक भागातील अनेक कंपन्यांच्या ट्रान्सपोर्ट वाहनांना वेळेवर इंधन मिळत नसल्याने उत्पादन साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी माल वेळेवर पोहोचत नसल्याने ऑर्डर उशिरा पूर्ण होत आहेत, तर काही कंपन्यांनी पर्यायी वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. वाहतूकदारांचे म्हणणे आहे की, पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून अनेकदा वाहनांना रिकाम्या हाताने परतावे
मर्यादित साठा
44 वाहतूक विस्कळीत झाल्याने कामगारांच्या ये-जा व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. काही औद्योगिक युनिटमध्ये उपस्थिती कमी झाल्याची माहिती आहे. मोठ्या उद्योगांच्या तुलनेत लघुउद्योगांकडे मर्यादित साठा असल्याने त्यांना अधिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

काळाबाजार वाढण्याची शक्यता
▶ वेळेत माल पाठवता न आल्यास निर्यातदार कंपन्यांचे व्यवहार अडकू शकतात. व्यापारी क्षेत्रातही पुरवठा स उशिरा होण्याची शक्यता आहे. टंचाई वाढल्यास काही ठिकाणी इंधनाचा काळाबाजार वाढण्याची शक्यता म असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने परिस्थिती व नियंत्रणात आणावी, औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र इंधन पुरवठा व्यवस्था करावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, इंधन टंचाई दीर्घकाळ टिकल्यास शहराच्या औद्योगिक अर्थचक्रावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
लागत आहे. यामुळे ट्रक, पिकअप आणि औद्योगिक मालवाहू वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. परिणामी बाजारपेठेतील पुरवठा साखळीवर दबाव वाढत आहे. इंधन टंचाईचा
विविध स्तरांवर परिणाम होऊ शकतो. कच्चा माल वेळेवर न मिळाल्यास उत्पादन प्रक्रिया मंदावू शकते. काही कंपन्यांमध्ये उत्पादन तात्पुरते थांबण्याची शक्यता व्यक्त
होत आहे. पर्यायी इंधन किंवा खासगी व्यवस्थेमुळे ट्रान्सपोर्ट खर्च वाढत असून त्याचा परिणाम अंतिम उत्पादनाच्या किंमतीवर होऊ शकतो.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions