मुंबईत मुख्यमंत्र्यांनी विलंबाबाबत व्यक्त केली नाराजी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम आणि अधिकारी-कंत्राटदारांमधील अंतर्गत बेबनावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.१५) तीव्र नाराजी व्यक्त केली. या दिरंगाईबद्दल मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदार कंपनीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) कडक शब्दांत हजेरी घेतली. शहराला वेळेत पाणी उपलब्ध करून देण्यापेक्षा केवळ प्रेझेंटेशन दाखवण्यावरच तुमचा भर आहे, अशा स्पष्ट आणि तिखट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.
शहराची २७४० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. मात्र, एका अधिकाऱ्याला निलंबित केल्याच्या कारणावरून इतर अधिकाऱ्यांनी पाणी योजनेच्या कामातून कार्यमुक्त करण्याचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होत आहे. याप्रकरणी महापौर
समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अतुल सावे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले तर, समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, आ. सतीश चव्हाण, सुहास शिरसाट, जीवन प्राधिकरणाचे सदस्य
सचिव रंगानायक, अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन, गोविंदराज, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अमोल येडगे, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे शिवा रेड्डी, जीवन प्राधिरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रारंभी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी योजनेच्या विलंबाबत नाराजी व्यक्त करत महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा विभागाने समन्वयाने काम
केवळ २९ टाक्यांचे काम पूर्ण
शहराच्या २०५२ मधील संभाव्य लोकसंख्येला ६०४ एमएलडी (दशलक्ष लिटर दर दिवशी) एवढा पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाणी वितरणासाठी शहरात ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार त्यापैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात १९११ किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी १२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ४६ हजार ५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र नवीन प्रस्तावावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
करुन योजना लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी, असे निर्देश दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











