आमदार अब्दुल सत्तार यांचा संवाद दौरा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक २ व ३ मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी दौरा करून नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी, समस्या आणि विविध विकासकामांच्या मागण्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत मांडलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले.

या दौऱ्यादरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रभागातील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ केंद्र येथे भेट देऊन भाविकांशी संवाद साधला. मंदिर परिसरात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. 

यावेळी आमदार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंद्र येथे वृक्षारोपण करून विविध विकासकामांचा शुभारंभपरिसराचा सर्वांगीण विकास, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते सुधाकर पाटील, कृउबा समितीचे होते.
नगरसेवक संचालक तथा नंदकिशोर सहारे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन नरेंद्र पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, शंकरराव खांडवे, मनोज झंवर, प्रशांत क्षीरसागर, डॉ. गणेश सपकाळ, मोतीराम मिसाळ, डिगंबर दादा, प्रभाकर खोडके, राजेंद्र साठे, महेंद्र चौधरी, स्वप्नील शेळके, रोहित कांकळ, प्रमोद चौथे, गजानन केनेकर यांच्यासह परिसरातील नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित