नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांचा दणदणीत विजय
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आपले वर्चस्व कायम राखत दणदणीत यश मिळवले आहे. सिल्लोड नगर परिषद निवडणूक निकालात त्यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्ष तसेच शिवसेनेच्या २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर पुन्हा स्पष्ट पकड निर्माण केली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी होते. मतदारांनी आ. अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना कौल दिला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू :
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल समीर अ. सत्तार यांनी ३१ हजार ४३८ मते घेवून भाजप उमेदवाराचा २३ हजार ६२६ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. प्रचंड मतांनी विजयी झालेल्या अब्दुल समीर यांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर स्पष्ट बहुमतासह विजय निश्चित केला. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकत्यांनी व समर्थकांनी भव्य विजयी मिरवणूक काढत शहरात आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे परिसर उत्साहाने भरून गेला.
विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते, समर्थकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
भाजपचा दारुण पराभव :
या निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवाराला मतांचा ८ हजाराचा टप्पा गाठला आला नाही. आणि २८ पैकी केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल समीर अ. सत्तार यांनी ३१ हजार ४३८ मते घेवून भाजप उमेदवाराचा २३ हजार ६२६ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला.
प्रचंड मतांनी विजयी झालेल्या अब्दुल समीर यांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर स्पष्ट बहुमतासह विजय निश्चित केला. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी भव्य विजयी मिरवणूक काढत शहरात आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे परिसर उत्साहाने भरून गेला. विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते, समर्थकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.














