आमदार अब्दुल सत्तारांचा दावा फेल ; राज्यमंत्री खोतकरांचा बाण युतीच्याच तंबूत

Foto

औरंगाबाद : मोठा गाजावाजा करत आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदार अर्जुन खोतकर हे दानवे विरोधात लढतील असा दावा माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेत केला होता. ये फेविकॉल का मजबूत जोड है टुटेगा नही असे भाकित त्यांनी केले होते मात्र आज शिवसेना भाजप युतीच्या विभागीय मेळाव्यात पशुसंवर्धन व वस्र उद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मी शिवसैनेचाच सैनिक म्हणत आमदार सत्तारांकडून करण्यात येत असलेला लोकसभेचा लढ्यवण्याचा मनसुबा खोटा ठरवला. दगाबाजी करणे शिवसेना तसेच आमच्या रक्तात नसल्याचे ते मेळाव्यात बोलताना म्हणाले. 

रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधाचे रणशिंग फुंकले होते. खोतकर हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मुळे जालना लोकसभा मतदार संघात यावेळेस नक्की बदल होणार असे त्यांनी ठासून सांगितले होते. मात्र या नाट्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध न करता खोतकर यांनी मी पूर्णपणे युतीधर्म पाळून मदत करेल असे आजच्या मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा फेल ठरला असून रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जालना लोकसभा मतदार संघातून डॉ. कल्याण काळे याना उमेदवारी देण्याचे किंवा मी स्वतः लढण्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र जालना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काळे यांची दिसून येत नसल्याने आमदार अब्दुल सत्तार यांनाच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अर्जुन खोतकर यांनी युतीधर्म पाळण्याचे आता स्पष्ट केल्याने आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेले सर्व दावे आज फेल ठरले