छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): माजी विरोधी पक्षनेते तथा आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि. २३) शिवसेनेचे दिवंगत पदाधिकारी श्रीकृष्ण राठोड व आदर्श शिक्षक राजन सोमासे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट दिली. यावेळी चाकू हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
येथील उपतालुकाप्रमुख श्रीकृष्ण राठोड यांच्यावरील चाकू हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची गांभीर्याने दखल घेत राठोड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी पं. स. सदस्या मीना राठोड, आशिष राठोड व राठोड परिवाराचे सांत्वन केले. तसेच राठोड यांच्या
मारेकऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी. यासाठी पक्षातर्फे सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आदर्श शिक्षक राजन सोमासे यांच्याही निवासस्थानी भेट देऊन, ग्रा. पं. सदस्या माधुरी सोमासे, श्रीराज सोमासे, दिनेश सोमासे यांच्यासह कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी ऋणानुबंध व जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. यावेळी अरविंद धीवर, विष्णू जाधव, हनुमान शिंदे, विशाल खंडागळे, अनिता पाटील, गणेश नवले, बजरंग पाटील, बिबन सय्यद, रतन नलावडे, रोहिदास चव्हाण, कपिंद्र पेरे, भगवान देशमुख, शंकर राठोड, सदाशिव पाटील, संजय मुरादे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.i
Powered By: Vrudhee Solutions













