आमदार भुमरे यांची चिमुकल्यांसोबत पैठण येथे दिवाळी उत्साहात साजरी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद चिमुकल्यांसोबत साजरा करण्यात आला.

प्रवाह परिवार अनाथ आश्रम, टाकळी (अंबड) येथील चिमुकल्यांसाठी यंदाची दिवाळी विशेष आनंदाची ठरली. आ. विलास भुमरे यांनी चिमुकल्यांच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी नवीन कपड्यांची खरेदी करून चिमुकल्यांच्या हाती नवीन कपडे सुपूर्द करण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील आनंद पाहून उपस्थित सर्वांचे मन गहिवरून आले.

आनंद, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या दिवाळीच्या सणात सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची, आपुलकीची आणि मायेची उब आवश्यक आहे, अशा चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश फुलवण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सुरू आहे.
या प्रसंगी आप्पासाहेब पाटील, निर्मळ, विनोद बोंबले, शेखर पाटील शिंदे, ईश्वर दगडे, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे पठाडे, कविता शिंदे, वैशाली परदेशी, पूजा पारीख, रुपाली सोनारे,  जयश्री गायकवाड, भारती मिटकर, राधा जाधव भाऊसाहेब तरमळे, राजू गायकवाड, कृष्णा मापारी, जनार्धन मिटकर, महेश मुंदडा, अजित पगारे, राज मानधने, महेश गाडे, ऋषिकेश दहिभाते, भारत कासोदे, रविराज क्षीरसागर, आशिष गिरे, मनीष औटे, अनमोल परदेशी, मनोज ससाने, दिनेश खंडागळे, गणेश वाघमोडे, प्रीतम अडसूळ, रशीद शेख, ज्ञानेश्वर बेडके तसेच प्रवाह अनाथालयाचे संचालक रामेश्वर गोर्डे आणि हेमलता गोर्डे यांची उपस्थिती होती.