पैठण, (प्रतिनिधी) : मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार विलास भूमरे यांनी नुकतीच भेट घेतली. पैठण तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
शेतकरी व नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता शेतकरी व नागरिकांना विशेष मदतीसह, तातडीच्या उपाययोजना तसेच आवश्यक शासकीय सवलती देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली.
मराठवाड्यातील जनतेला या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.















