आमदार निवास बॉम्बने उडवून देण्यची धमकी

Foto
 रात्री मुंबईत शहरात एक धक्कादायक घटना घडली. रात्री पावणेबाराच्या सुमारास मुंबईतील आकाशवाणी समोर असलेले आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक फोन आला. बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरावरून फोन आला होता. पुढील पाच मिनिटांमध्ये आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आमदार निवास सुरक्षा व्यवस्था, पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. या शोध मोहिमेमध्ये बॉम्ब सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker