राज ठाकरेंचा शिवसेनेवर घणाघात- 'बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला गिळण्याचा डाव'

Foto

मुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारला भूखंड मिळत नाही हे दुर्दैव आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि सरकारवर तोफ डागली. स्मारकासह मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नांसह मुंबईतील अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला शिवसना गिळत असल्याचा घणाघात केला.

बाळासाहेबांच्या नावाखाली शिवसेना महापौर बंगला गिळंकृत करत आहे
शिवाजी पार्क मधील जिमखान्याची जागा ही बॅडमिंटन आणि टेनीस खेळासाठी राखीव आहे. त्यामुळे या जागेवर कुठल्याही परिस्थितीत महापौर बंगला होता कामा नये, अशी रोखठोक भूमिका राज यांनी घेतली. त म्हणाले, ज्या महापौर बंगल्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी संघर्ष केला, आज त्याच बंगल्यातून महापौरांना बाहेर काढले जात आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला स्वत:च्या स्वार्थासाठी गिळला जातोय असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला. ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे देशातील पहिले स्मारक आम्ही नाशिक मध्ये बांधले त्याप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महाराष्ट्रात केव्हाही आणि कुठेही जागा उपलब्ध होईल असे देखील ते यावेळी म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या आंदोलनानंतर न्यायालयाने रेल्वेच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाले बसणार नाहीत असा निर्णय दिला होता. परंतु पालिकेतील अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना या परिसरात बसवतात. महापालिकेने त्यांना हटवले नाही तर पुन्हा आंदोलन करू,  असा इशाराही त्यांनी दिला.