औरंगाबाद – खासदार चंद्रकांत खैरेंसारखा लाचार माणूस शोधूनही सापडणार नाही. ते कधी पाया पडताना दिसतील, तर कधी मार खाताना तरी दिसतील, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. मनसेच्या दंडुका मोर्चाचे विभागीय आयुक्तालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी देशपांडे यांनी खासदार खैरे यांच्यावर सडकून टीका केली.
काय म्हणाले संदीप देशपांडे
मनसेचे फायरब्रँड नेते आणि मुंबई महानगर
पालिकेचे माज नगरसेवक संदीप देशपांडे यांनी खासदार खैरेंचा खरपूस समाचार घेतला. ते
म्हणाले, ‘खासदार असलेली
व्यक्ती कधी उद्धव ठाकरे यांच्या पायात लोळण घेताना दिसते तर कधी आदित्य ठाकरेंचे
पाय धरताना दिसते. एवढा लाचार माणूस शोधूनही सापडणार नाही.’ देशपांडे म्हणाले, खैरेंना
पायाच पडायचे असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या पाया पडायला पाहिजे. खासदार असून
त्यांनी कधीही संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही. खासदाराचे काम काय
असते, असा सवाल उपस्थित करत देशपांडे म्हणाले, औरंगाबादचे खासदार एका
महापालिकेपुरते मर्यादित आहेत. औरंगाबादच्या विकासाऐवजी त्यांनी पालिकेत फक्त
भ्रष्टाचार केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला.
सरकारने फक्त गाजर दाखवले
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्यातील फडणवीस
सरकारने वेळोवेळी कर्जमाफीची आकडेवारी जारी केली. मात्र ही सर्व आकडेवारी फसवी
होती. सरकारने शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवले, असा आरोप संदीप देशपांडेंनी केला. ते
म्हणाले. ‘सरकारने आश्वासन
दिले होते की हमी भावापेक्षा कमीदराने जो व्यापारी शेतमाल खरेदी करेल त्याच्यावर
गुन्हे दाखल केले जातील. मात्र राज्यात आतापर्यंत व्यापाऱ्यावर एकही गुन्हा दाखल
झालेला नाही.’
राज ठाकरे जनतेच्या मनात
मनसेच्या मोर्चानिमित्त शहरात ठिकठिकाणी राज
ठाकरे आणि मनसेचे होर्डिंग्ज आणि बॅनर लागले होते, ते पोलिसांनी काढून टाकले.
याचाही समाचार देशपांडेंनी मनसे स्टाईल घेतला ते म्हणाले, ‘पोलिसांनी सरकारच्या
इशाऱ्यावर आमचे बॅनर काढून टाकले, परंतू जनतेच्या मनात राज ठाकरे आहेत, ते
तुम्हाला काढता येणार नाही.’
देशपांडेंनी एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचे
सांगितले. ते म्हणाले, राज ठाकरे आणि मनसे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत.
शेतकऱ्यांनीही राज ठाकरेंसोबत राहिले पाहिजे.










