VIDEO - ढोल ताश्याच्या गजरात मनसेचे आंदोलन, दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना असा शिकवला धडा

Foto

औरंगाबाद- कार्यालयात हजार न राहणाऱ्या दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना  मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला.गंगापूर मधील सुमारे१० विविध कार्यालयातील गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्त करून एका वाहनातून ढोल यशाच्या गजरात अधिकाऱ्यांच्या खुरच्यांची  मिरवणूक काढण्यात आली.


दुष्काळग्रस्त भागात आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयातील अधिकारी यांनी हजार राहणे बंधनकारक असताना गंगापूर तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी या नियमांची पायमल्ली करीत कार्यालयाला दांडी मारत होते.त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसभर कार्यालयात ताटकळत राहावे लागत होते. व अधिकारी उपस्तीत नसल्याने  खाली हात परतावे लागत असेत्यामुळे आज सोमवार असल्याने  मनसेच्या वतीने गैरहजर अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात आले.


मनसेचे जिल्हा सचिव वाल्मिकी क्षीरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक कार्यालयाच्या पाहनी साठी 12 पथक बनविण्यात आले होते.या पथकांनी उपजिल्हा रुग्णालय,तालुका कृषी अधिकारी कार्यालयआरोग्य केंद्र,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभागवीज वितरण कार्यालय अशा विविध कार्यालयात जाऊन पंचनामा केला. व गैरहजर अधिकाऱ्यांच्या मस्टर ,व खुर्च्या जप्त केले. त्या नंतर कार्यकर्त्यांनी एक एक करून सर्व कार्यालयातील गैरहजर अधिकाऱयांच्या खुर्च्या एका वाहनात टाकून त्या खुर्च्या ची वाजत गाजत गावभर मिरवणूक काढली. या  आंदोलनामुळे शासकीय दांडीबहाद्दर  अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसते. दुपार पर्यंत मनसे कार्यकर्ते विविध शासकीय कार्यालयात जाऊन कार्यालयातील अधिकाऱ्यांची पाहणी करीत होते.त्या नंतर या खुर्च्या तहसीलदार यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती मनसेचे जिल्हा सचिव वाल्मिकी क्षीरसाठयांनी यावेळी दिली.

 

 

या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या केल्या जप्त


डॉ साजिद वैधकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालयव्यंकट ढगे तालुका कृषी अधिकारीमंगेश घोडके तालुका आरोग्य अधिकारीव्ही आर पाटील गट विकास अधिकारीठाकूर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागसरोदे उप अभियंताविशेष प्रकल्प अधिकारीपुंड सहहयक अभियंता वीज वितरण कार्यालय,

 

दांडी बहहदूरणा सुता सारखे सरळ करू

वाल्मिक  शिरसाठ यांनी सांगितले की गंगापूर तालुक्यातील  शासकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे. शेतकऱ्यांचे कामे होत नाही. या पुढे मनसे असे खपून घेणार नाही वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker