मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (शनिवार) सहकुटुंब अयोध्येला रवाना होणार आहेत. त्यांच्या अयोध्येतील सभेला योगी सरकारने परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आज शिवसेना भवनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेची खिल्ली उडवणारे पोस्टर लावले आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजुनही खिशात...’ या आशयाच पोस्टर मनसेने दादर येथील शिवाजी पार्क परिसरात लावले आहे.
अयोध्येच्या
निमित्ताने आगामी निवडणुकीत हिंदू मतांचे राजकारण करण्यासाठी शिवसेनेचा हा दौरा
असल्याची टिका त्यांच्यावर होत आहे. त्यातच मनसेने दादर, शिवाजी पार्क परिसरात
पोस्टर लावून शिवसेनेच्या वर्मावरच बोट
ठेवले आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगायची,
जनतेसमोर आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी लढतो असे सोंग आणत राजीनामा अस्त्र वापरायचे
असे सेनेचे दुहेरी राजकारण सुरु असल्याचेच या पोस्टरमधून सुचवण्यात आले आहे.
ठाकरे कुटुंब प्रथमच
राजकीय दौऱ्यासाठी महाराष्ट्राबाहेर
उद्धव ठाकरे,
रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे प्रथमच राजकीय दौऱ्यासाठी
महाराष्ट्राबाहेर जात आहेत. अयोध्येत सभा घेण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची जोरदार
तयारी होती. मात्र योगी सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे परवानगी नाकारली. उद्धव आणि
ठाकरे कुटुंबीय शनिवारी सकाळी ११ वाजताच्या विमानाने अयोध्येला जाणार आहेत.
फैजाबाद विमानतळावर दुपारी २ वाजता उतरणार आहेत. या दौऱ्यात ते सभा घेणार होते
मात्र सभा रद्द झाल्यानंतर आता फक्त साधु संतांची भेट आणि रामजन्मभूमीचे दर्शन
एवढाच त्यांचा कार्यक्रम असणार आहे.
शिवसेना जनतेची
दिशाभूल करत आहे
मनसेसोबतच
राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केली
आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे, की शिवसेना हिंदुत्वाच्या
मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस नेते माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना – भाजप पोरखेळ
करत आहे.
















