वृक्षतोडीच्या विरोधात मनसे मैदानात , थेट राज ठाकरे २८ तारखेला कर्जत दौर्‍यावर

Foto
मुंबई : कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापत चालला आहे. टोरेंट कंपनीसाठी ही वृक्ष तोड सुरु आहे. विरोधक या मुद्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या २८ तारखेला कर्जत दौर्‍यावर जाणार आहेत. कर्जत तालुक्यातील भीमा शंकरला भेट देणार आहेत. ग्रामस्थ आणि आदिवासी नागरिकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलीस ग्राउंडला सभा घेणार आहेत. गुजरातच्या कंपनीसाठी झाडांची तोड सुरू असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. कर्जतमधील जंगलात आतापर्यंत २ हजार ७५ झाडे तोडल्याचा दावा करण्यात येतोय.

वृक्षतोडीला परवानगी कशी दिली? असा मनसेचा सवाल आहे. ९० हजार झाडे लावण्यासाठी जागा कुठून आणणार? संदीप देशपांडे यांचा प्रश्न. दिल्लीतील दोन लोक सह्याद्रीचं भविष्य ठरवणार नाहीत, अशी टीका केली. निसर्गाचा र्‍हास करून कोणताही विकास नको, अशी मनसेची भूमिका आहे. २८ ऑक्टोबरला राज ठाकरे कर्जतमध्ये जंगलाची पाहणी करणार. त्यानंतर जाहीर सभा घेणार आहेत. वृक्षतोडीविरोधात २८ ऑक्टोबरला पूर्ण ताकदीने आंदोलन करणार असल्याचा मनसेने इशारा दिला आहे.

गुजरातच्या कंपनीसाठी ही झाड तोडतायत
गुजरातच्या कंपनीसाठी ही झाड तोडतायत. २८ तारखेला राज ठाकरे कर्जतमध्ये सभा घेणार आहेत. २८ तारखेला जंगालात राज ठाकरे पाहाणी करणार आहेत. २०७५ झाडे कापली आहेत. अजून काही झाडं कापणार असा स्थानिकांचा आरोप आहे. ही झाडं तोडायला कशी परवानगी दिलीफफ असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

वृक्षतोडीला तुम्ही कशी परवानी देताय?
वृक्ष तोड ही वैध कशी आहे?. वृक्षतोडीला तुम्ही कशी परवानी देताय? त्या गावातील लोकांना रस्ता करताना परवानगी देत नव्हते. ९० हजार झाडे लावायला जागा कुठे आहे?. दिल्लीत बसलेले दोन लोक सह्याद्रीचं भविष्य ठरवणार नाही. निसर्गाचा र्‍हास करून कोणताही विकास नको असं संदीप देशपांडे म्हणाले.

याचं थोबाड उघडून उत्तर द्याच
विदारक दृश्य आहे. मन विषण्णं करणारी जंगल तोड तिथे झाली. १५० वर्षांपासून असलेली झाडे तोडून टाकली. हा कुठला विकास आहे? ज्यात आयुर्वेदिक झाडं कापली. मुख्यमंत्री म्हणताना ग्रीन प्रोजेक्ट आहे. झाड कापून कुठलं ग्रीन प्रोजेक्ट मुख्यमंत्री करणार?फफ अशी टीका मनसेकडून करण्यात आली. ङ्गङ्घग्रामपंचायतीने कोणताही ठराव केलेला नाही. वृक्ष तोडीला परवानगी कशी देता?. ती वैध कशी झाली याचं थोबाड उघडून उत्तर द्याचफफ असं संदीप देशपांडे म्हणाले.