छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. टी.व्ही. सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला औपचारिक सुरुवात करण्यात आली. या अभियानाला युवक, नागरिक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार, राजू घोरपडे पाटील, अॅड. विनोद भाले (राज्य उपाध्यक्ष, विधी व जनहित कक्ष), शहर उपाध्यक्ष अमित भांगे, जॉन बोरगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लिला राजपूत, शहराध्यक्ष अनिता लोमटे, बाबूराव जाधव, मनोज भिंगारे, नीरज बेरेजा, अमित जैस्वाल, रविंद्र गायकवाड, कार्तिक फरकडे पाटील, रोहित ठेंगे पाटील, निखिल ताकवाले, शुभम नवले, चंदू नवपुते, राजू थोरात, अभिजीत पाटील, प्रकाश जाधव, सिद्धार्थ पवार, उमेश पाटील, निखिल जावळे, मुकेश पाटील, अनंत दंडुके, दिगंबर भाले, संदीप बेदरकर, संजय काटकर, भारत पाटील, पंडित कुंटे, प्रकाश पवार, गणेश खांडवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभासद नोंदणी अभियानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.














