अधीक्षक पदाची भरती चार वर्षांपासून रखडली; उमेदवारांमध्ये संताप
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील 'अधीक्षक, गट-ब' पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडल्याचा प्रकार समोर आला आहे. जाहिरात क्रमांक ९०/२०२२ अंतर्गत ६५ जागांसाठी सुरू असलेल्या या प्रक्रियेतील चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने लोटले, तरीही आयोगाकडून मुलाखतींबाबत कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे स्पर्धा परीक्षाार्थीमध्ये नाराजी संतापाचे वातावरण आहे.
या पदासाठी २१ ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम २१ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. ऑनलाइन चाळणी परीक्षा १४ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली. त्यानंतर अंतिम उत्तरतालिका १३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आठ महिन्यांनंतर २४ जुलै २०२६ रोजी चाळणी
मुलाखत प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
२०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीपासून आतापर्यंत भरती प्रक्रियेला जवळपास चार वर्षांचा कालावधी लागला आहे. अनुभवावर आधारित विविध पदांच्या परीक्षा प्रक्रियेत अशा प्रकारचा विलंब होत असल्याने भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आयोगाने मुलाखतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून उमेदवारांना पुढील प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले तरी मुलाखतीची तारीख अद्याप निकालानंतर दोन महिने उलटूनही
मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांचा संभ्रम वाढला आहे.
https:liepaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












