औरंगाबाद: शासनाच्या वतीने यावर्षी देखील भरमसाठ वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये प्रत्येक विभागाला दिले आहे. यावर्षी देखील कोट्यवधीचे उद्दिष्टये जाहीर केले आहे. मात्र वृक्षसंवर्धनाचे काय? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एमटीडीसीलाही जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तब्बल 16 हजार 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये दिली आहेत. अशी माहिती एमटीडीसी व्यवस्थापक विजय जाधव यांनी दै. सांजवार्ताशी बोलतांना दिली.
हरीत महाराष्ट्राचे स्वप्न समोर ठेऊन दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये दिली जात आहे. यावर्षी देखील 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत एमटीडीसीला 16 हजार 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये दिले आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळी वृक्ष लागवड करण्यासाठी एमटीडीसीने 7 हजार 350 खड्डेही खोदले आहे. औरंगाबाद मधील पर्यटक निवासी येथे 500 वृक्ष लावण्याची उद्दिष्ट्ये दिली आहे. तर कलाग्राममध्ये 2 हजार 500, सोयगांव जिल्ह्यातील फर्दापूर गेस्ट हाऊसमध्ये 3 हजार, अंजिठा व्हयु पॉईंटमध्ये 1 हजार 500, अजिंठा अभ्यागत केंद्रात दोन हजार वेरुळ तसेच खुलताबादमध्ये 2 हजार वृक्ष तसेच सिल्लोड, तुळजापुर, औंढा नागनाथसह आदी पर्यटनस्थळी एकूण 16 हजार 300 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्ये यावर्षी एमटीडीसीला दिले आहे.