नवी मुंबई: नवी मुंबईत दारूच्या नशेत फोन करून पोलिसांची झोप उडवण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. एका व्यक्तीने ११२ या पोलीस हेल्प लाईन वर फोन करून राज ठाकरे याला शूट करणार असा बरगळला.पोलिसांनी हा खोडसाळ पणा आहे हे ओळखले मात्र देशातील सध्याचे वातावरण पाहता कुठलीही माहिती सहज घ्यायची नाही हे ठरवल्याने फोन करण्याचा तात्काळ शोध घेण्यात आला. नियमाप्रमाणे त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
कैलास बोकोलिया (वय ५० ) असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे राहण्यास पावणे गावातील असून तो डिलिव्हरी बॉयचे काम करतो. १५ तारखेला दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी त्याने नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष येथे फोन केला. त्यावर पोलीस कर्मचार्याचे काहीही ऐकून न घेता त्यांच्या प्रश्नांना उत्तर न देता स्वतःच बोलत होता. त्याने राज ठाकरे यांना शूट करणार अशी माहिती देत फोन बंद केला. पोलिसांनी पुन्हा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. नियंत्रण कक्षाने हि माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना दिली. तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत फोन करण्याचा शोध सुरु केला.
तांत्रिक तपासात आरोपी हा पावणे येथे असल्याचे समोर येताच त्याला ताब्यात घेतले गेले . त्याच्या विरोधात शांतता भंग करणे, उकसवणे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला नियमाप्रमाणे नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. असाच प्रकार ७ एप्रिल रोजी घडला होता.
तुफान नुरल शेख या बिगारी काम करून गुजराण करणार्या व्यक्तीने सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी एपीएमसी पोलिसांना एका मोबाईल क्रमांकावरून एक फोन आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने ङ्गङ्घकॉलर बोल्ट आहे आतंकवादी आहे ते मुंबई मध्ये बॉम्ब उडवणार आहे.फफ अशी तोकडी माहिती देत फोन कट केला.
तांत्रिक तपास वेगात सुरु केल्याने जेथून फोन आला ते लोकेशन शोधण्यात आला . त्या परिसरात शोध सुरु केला असता एक संशयित इसम आढळून आला. त्याचा पकडून पोलिसांनी चौकशी केली असता तुफान नुरल शेख असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. तो कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळेल ते काम करून गुजराण करतो व रात्र जेथे जागा मिळेल तेथे घालवतो.
ज्या मोबाईल क्रमांक वरून पोलिसांना फोन आला तो फोनही त्याच्या कडे आढळून आला. .त्याने मस्करी म्हणून फोन केल्याचे सांगितले. त्याचा विरोधात गुन्हा नोंद करून नोटीस बजावण्यात आली होती. मद्य प्राशन करून पोलिसांची झोप उडवणारे दोन प्रकार घडले असले तरीही सर्व फोन गांभीर्याने घेण्यात येतील . आणि नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलिसांनी दिली.