मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक, सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात?

Foto

लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सुरु असलेल्या मतमोजणीत काँग्रेस ११३, भाजप १०७, बसप ४ तर ईतर पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत नसून, सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कुठल्याच पक्षाला बहुमत नसले तरी, काँग्रेस कोणाचाही पाठींबा न घेता सत्ता स्थापन करेल असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने निकाल लक्षात घेत, अपक्षांना जुळवून घेण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांना दिली आहे. त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष कोणाच्या बाजूने जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.