डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान

Foto
पैठण, (प्रतिनिधी): महाराष्ट्र भूषण, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी १ मार्च, २०२६ रोजी महास्वछता अभियान आयोजित केले होते. श्री. क्षेत्र पैठण व परिसरात, सकाळी ७:३० वाजेपासून १०:३० वाजेपर्यंत हे अभियान राबविण्यात आले आहे. 

जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता यावी, प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रशासकीय कार्यालये, वाहतूक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम समाज उन्नतीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतात. 

गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरु असलेल्या ह्या कार्याची देशभरात व देशाबाहेर ख्याती असून, स्वयंप्रेरणा आणि सेवाभाव या हेतूने अभियान यशस्वी होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री क्षेत्र पैठण नगरपालिकेच्या सहकार्याने खालील ठिकाणी ही स्वच्छता भगवान महावीर चौक ते जिजाऊ चौक. गीता मंदिर ते एसटी बसस्थानक. सावरकर चौक ते एसटी बसस्थानक तहसील मार्गे श्री बैठक परिसर, नागघाट ते गागाभट्ट चौक, गागाभट्ट चौक ते श्रीनाथ महाराज मंदिर, तीर्थ खांब ते श्रीनाथ महाराज वाडा परिसर, हॉटेल सह्याद्री ते महाराणा प्रताप चौक (बसवेश्वर चौक मार्गे), श्रीनाथ महाराज मंदिर नदीपात्र ते नागघाट, श्रीनाथ महाराज मंदिर दिंडी वाहन पार्किंग, दत्त मंदिर परिसर ते पेट्रोल पंप कमान, श्रीनाथ महाराज वाडा ते गागाभट्ट चौक, श्रीनाथ महाराज मंदिर डोम परिसर, येथे सदस्य स्वयंसेवकांच्यावतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

या मोहिमेत आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, श्री रेणुका देवी शरद पवार सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पाटील निर्मळ, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, सर्व पक्षाचे नगरसेवक, वकील, डॉक्टर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आमदार विलास भुमरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार भुमरे यांनी या अभियानासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. या स्वच्छता अभियान मध्ये हजारो टन सुका व ओला कचरा संकलित करून त्याची
स्वच्छता विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता विभागाचे प्रमुख व्यंकटी पापुलवार, अशोक मगरे, उजगीरे, अशोक मगरे, यांच्यासह नगरपरिषेचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.