महाराजस्व अभियानाचा सिल्लोड येथे समारोप

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा १ चा समारोप आमदार अब्दु‌ल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

छत्रपती महसूल प्रशासन है केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या, अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा उल्लेख करत शिवकालीन महसूल कार्यपद्धतीची उदाहरणे दिली. शिवरायांच्या प्रशासनात स्यतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य होते. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी.

योजना केवल कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शासनाच्या सर्व यंत्रणेने समन्वयातून काम करत पात्र लाभाथ्र्यांना शासकीय योजनांचा लाभमिळवून द्यावा, घरकुल योजनेंतर्गत
लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, 
तहसीलदार यांना दिल्या. या अभियानामध्ये तब्बल ६८३७ प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभदेण्यात आला. शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही पात्र लामाथ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर,
अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय अधिकारी व उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे, संजय डमाळे, सुखदेव जाधव, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, शेख इम्रान, नायब तहसीलदार तुकाराम बनकर, मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे आर्दीसह लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या शेवटी विविध शाळांमधील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी व माजी सैनिक अधिकारी कर्मचान्याचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले तर मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.