छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर पूर्व विधानसभा बैठक एन-२ सिडको मुकुंदवाडी परिसरात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
T T र --
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा विनिमय करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे यांनी सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र नवपुते पाटील, जिल्हा संघटक अशोक पवार पाटील, सोसायटीचे डायरेक्टर अशोक आंबुलगेकर, सोसायटीचे डायरेक्टर रमाकांत निकम पाटील, सोसायटीचे डायरेक्टर संजय खानविलकर, रेणुका
-
माता मंदिराचे दिनेश जैस्वाल, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र एन-२ चे सेवेकरी शरद बनकर, अंबिका इलेक्ट्रिकलचे अनिल पाटील व इतर नागरिकांशी चर्चा करून राज ठाकरे यांचे विचार मांडले. बैठकीस मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपिन नाईक यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु घोरपडे पाटील, भारत गायकवाड, शहर चिटणीस आकाश खोतकर, विभाग अध्यक्ष शिवा करवंदे, उपविभाग अध्यक्ष मंगेश वैद्य, जालिंदर गायकवाड, गणेश घणराज, अभिजित पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















