छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे नेते, गृहराज्यमंत्री तथा संपर्क नेते बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी संकल्प हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठक नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे, बिपीन नाईक, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार गावागावात आणि घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक प्रश्नांवर मनसे आक्रमक भूमिका घेणार असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी पुढाकार घ्यावा तसेच आगामी सर्व निवडणुकीची तयारी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शहर व विविध तालुक्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या आणि संघटनात्मक बाबींवर मते मांडली. पक्ष विस्तार, नवीन कार्यकर्ते जोडणे, शाखा मजबूत करणे आणि स्थानिक पातळीवर जनतेशी संवाद वाढवणे यावरही विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, डॉ. शिवाजी कान्हेरे, विद्यार्थी सेनेचे राज्य
नवनिर्वाचित जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे व बिपीन नाईक, नांदेड जिल्हा संपर्क अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, शहर सचिव राहुल पाटील, प्रशांत जोशी, मंगेश साळवे आदी.
सरचिटणीस राजीव जावळीकर, मंगेश साळवे, शहर सचिव राहुल पाटील, महिला सेनेच्या लीला राजपूत, नूतन जैस्वाल, अनिता लोमटे, जिल्हा चिटणीस प्रशांत जोशी, विधी विभागाचे अॅड. विनोद भाले, रस्ते आस्थापनाचे अशोक पवार यांच्या सह प्रमुख पदाधिकारी अमित भांगे, प्रशांत दहीवाडकर, मनोज पाटील मुरदारे, किरण जोगदंडे, राजू घोरपडे, नितीन शेळके, आप्पासाहेब वानखरे, के. के. जाधव, नारायण खरात, अनिल शेळके, अमित जैस्वाल, निलेश बरेजा, बाबूराव जाधव, कार्तिक पाटील, रोहित ठेंगे, अशोक कराळे, शुभम नवले, रवी गायकवाड, निखिल ताकवले, भगवान खाटीक, शेखर रणखांब, अभय देशपांडे, प्रतीक गायकवाड, नागेश तुसे, यश बर्वे, सतीश देवगिरीकर, प्रवीण मोहिते, अजमत खान, मदन थोटे, राजेंद्र धुरट, संदीप भुसावलकर, विशाल भालेराव, विशाल बेंद्रे, रितेश देवरे, राहुल तीनगोटे, सीताराम सपकाळ, अभय मांजरकर,
अस्लम सय्यद, अशोक पवार, निखिल मालू, बाबासाहेब बागल, संदीप आरख, जगदीश इरालपल्ली, अमित ठाकूर, रवी गायकवाड, सलमान पठाण, शिवाजी भादे, झाकेर पठाण, सचिन भंडारे, शेख मेहबूब, नागेश तुसे, रवी काळे, राहुल गिरे, अभिजित गायकवाड, सौरभदेशमुख, प्रज्योत थिटे, ऋषिकेश पाटील, मंगेश वैद्य, भारती आहेरकर, अलका क्षीरसागर, अशोक कात्रे, मोहम्मद उबेद, परजी चितळे, गणेश शेवाळे, योगेश नाईक, रितेश देवरे, प्रदुम्न पराये, शंकर मतसागर, किरण जाधव, योगेश परदरे, संजय इंगळे, प्रकाश नाजन, गणेश भारती, कन्हैय्या मोरेल्लू, आनंद असले यांच्या सह शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











