बाभुळगाव नांगरे येथे महाशिवपुराण कथेला प्रारंभ

Foto
महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज हजारो भाविकांची उपस्थिती

गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील बाभूळगाव नांगरे येथे महामंडलेश्वर श्री श्री १००८ शिवगिरी जी महाराज यांच्या सुश्राव्य बाणीतून काल सोमवारपासून महाशिवपूरान कथेला सुरुवात झाली असून कथेच्या पहिल्या दिवशीचे पुष्प गुंफतांना महाराजांनी सांगितले की, सध्या धर्माचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे क्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनी तन धर्मासाठी दिल पन मन बदलू दिल नाही व स्वधर्माचा त्याग केला नाही अशा पवित्र धर्माचे रक्षण करणे सर्वोची जबाबदारी आहे त्यामुळे धर्म जागवा असे आवाहन उपस्थित शिवभक्ताना केले.

दरम्यान सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांचे बाभुळगाव येथे आगमन झाले फटाक्याच्या आतिषबाजीत महाराजांचे स्वागत करण्यात आले सर्वप्रथम महाराजांनी ग्रामदैवत मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कथास्थळी आगमन झाल्यानंतर महाराजांवर शेकडो शिवभक्तांनी पुष्पवर्षाव केला व्यासपीठावरील जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीचे पूजन केले व शिवमहापूरान कथेला प्रारंभ झाला आहे. 

यावेळी व्यासपीठावर श्री. श्री. १००८ विमलगिरीजी महाराज, महंत रविनंदगिरीजी महाराज, भरतानंद गिरीजी महाराज, दत्त महाराज, ज्ञानेश्वरमारती महाराज गाणगापूर आश्रम आदिचेही पूजन आयोजक ब्र. गजानन बापूजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ब्र. गजानन बापूजी काल सोमवारपासून ते १४ में दरम्यान होणाऱ्या भव्य धर्मसंसद व नर्मदेश्वर महादेव वं दत्तमंदिराचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून महामहलेश्वर शिवगिरीजी महाराज यांची तिनंदिवसीय शिवमहापूरान कथा चालू झाली आहे १४ मे रोजी १०८ साधूसंतांच्या उपस्थितीत धर्मसंसद होणार असून या धर्म संसदेचे अध्यक्षही महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज असणार आहेत.

१०८ संतांचे पुजन, दर्शन, सत्सग सोहळा पार पडत असून श्री आदिनाथ गुरुदत पिठाच्या नवीन जागेमध्ये भव्य नवमंदिरात श्री आदिनाथ गुरुदत्त भगवान मूर्ती तसेच नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्प्रतिष्ठा स्वर्णजडीत कलशारोहण तसेच जगद्वरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी महाराज आश्रम) सत कुटियाचे लोकार्पण सोहळाहीं संत महंत यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवमहापुराण कथेचे मुख्य यजमान प्रितमकुमार मुधा (संचालक, दि. वैजापूर मर्चन्ड को ऑप बँक लि. लासूर स्टेशन) हे असून आश्रम, कुटीया लोकार्पण जगदूरु श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज व  साधुसंतांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रम्हचारी गजानन बापूजी यांनी केले आहे