गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) एकत्रित निवडणूक लढणार अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी केली.
गंगापूर येथे आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, सुभाष कानडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण शहराध्यक्ष अहेमद पटेल,
तालुका सरचिटणीस काशिनाथ धरपळे, तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरध्यक्ष संदीप दारुंटे, नगरसेवक नईम मन्सूरी, सुनील धाडगे उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले या बैठकीस विश्वजीत चव्हाण, लक्ष्मण सांगळे आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना मागविण्यात आल्या व त्यावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. गंगापूरात निवडणूक एक दिलाने लढण्याचे आवाहन करण्यात आले. निवडून येणाऱ्या कार्यकर्त्या ला प्राधान्य देण्यात येईल असे सांगण्यात आले.















