मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर १७ जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजपकडून ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवारांची नावंही जवळपास निश्चित झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
काँग्रेस आणि पवार गटाचे उमेदवारही ठरल
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होण्याची शक्यता आहेय. या १७ जागांच्या लढाईत कुणाचा विजय होतो आणि कुणाचा पराजय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. एकूण पाच नावे जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर-वर्धा, अमरावती, यवतमाळ, लातूर आणि सोलापूर येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर अहमदनगर, नागपूर आणि भंडार्यातील उमेदवारांची नावे थोड्याच वेळात फायनल होणार आहेत. त्यामुळे या तीन ठिकाणी काँग्रेस कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या ११ उमेदवारांची यादी
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड - अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
शिवसेनेच्या ४ उमेदवारांची यादी
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ उमेदवारांची यादी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे (संभाव्य उमेदवार)