छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पहिल्याच दिवशी मोठा तांत्रिक फटका बसला. जायकवाडी वसाहतीच्या स्मशानभूमीजवळ नवीन योजनेच्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, पहिल्याच दिवशी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने दिलेली १२ जूनची डेडलाइनदेखील या अपघातामुळे हुकली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शुक्रवार (दि. १२) पासून नवीन योजनेतून शहरासाठी २५ ते ३० एमएलडी पाणी आणून पुरवठा सुरू
तयारी होती. करण्याची जोरदार प्रशासनाने केली मात्र, ऐन मुहूर्तावरच व्हॉल्व्ह फुटल्याने मजीप्राने (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) जीव्हीपीआर कंपनीमार्फत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यापूर्वी ४ जूनपर्यंत
टँकरमुक्तसाठी आणखी दीड वर्ष
▶ विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकारांसमोर एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, शहरातील सर्व वसाहतींना सुरळीत आणि नळाने पाणीपुरवठा होण्यासाठी अजून किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. सध्या ज्या भागांत जलवाहिन्यांचे जाळे नाही तिथे टँकरनेच पाणी दिले जात आहे. या भागांतील जलकुंभांचे (टाक्यांचे) बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच नळाने पाणी देणे शक्य होईल.
खर्च वाढणार; पण टंचाई कमी होणार
▶ शहर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे १०० ते १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार एक वर्ष पूर्ण योजनेची देखभाल करेल, तसेच पुढील १० वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा कालावधीही त्याच कंत्राटदाराकडे असणार आहे. दरम्यान, सध्या शहराला जुन्या व्यवस्थेतून १० एमएलडी पाणी वाढवून मिळाले आहे, ज्यामुळे काही वसाहतींमधील पाणी टंचाईची तीव्रता थोडी कमी होण्यास मदत होईल.
नवीन योजनेतून पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात आली होती आणि नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात साठाही केला होता. मात्र, त्यानंतर तेथील
पाइपलाइनला गळती लागल्याने
तीन दिवसांचा शटडाऊन घ्यावा
लागला होता आणि आता पुन्हा
नव्या दुरुस्तीमुळे शहरवासीयांची
प्रतीक्षा वाढली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















