सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

Foto
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ६ एप्रिल २०२६ रोजी, सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोन्याचा भाव १,४८,५६० रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडला, तर चांदीची किंमत २,३०,२०० रुपये प्रति किलोवर खुली झाली.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमधील या घसरणीचे मुख्य कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेले सततचे इशारे हे आहे. ट्रम्प यांच्या इशार्‍यानंतर जागतिक तणाव वाढत चालला आहे.

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी २ एप्रिल रोजी, एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २,३२,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. ३ एप्रिल रोजी मगुड फ्रायडेफ निमित्त बाजार बंद असल्याने आज थेट व्यवहार होत आहेत.

मागील बंद भावाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत १,०९० रुपये प्रति १० ग्रॅमची घट नोंदवण्यात आली आहे, तर चांदीच्या किमतीत २,४०० रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या ऐतिहासिक उच्चांकावरून सोनं आता ३१,४४० रुपये आणि चांदी १,८९,८०० रुपयांनी खाली आली.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,०७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,४९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,३४० रुपये झाला आहे. तर दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९२० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,३४० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,१९० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.